Apurva Kulkarni
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान अशातच जान्हवीने मासिक पाळीबाबत भाष्य केलं आहे.
मासिक पाळीबद्दल घृणा व्यक्त करणाऱ्या पुरुषांबाबत जान्हवी कपूरने भाष्य केलं आहे.
एका मुलाखतीत जान्हवी कपूरने महिलांच्या मासिक पाळीमध्ये होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं आहे.
तिने म्हटलं की, मासिक पाळीमध्ये महिलांचे मूड कसे बदलतात, आणि त्यांच्या बोलण्यामध्ये बदल होऊ शकतो.
'जर एखादी महिला विनाकारण भांडण करत असेल तर त्याचा अर्थ तिला मासिक पाळी आली आहे, आणि ती खूप त्रासात आहे.'
जान्हवी पुढे बोलताना म्हणाली की, 'काही पुरुष मासिक पाळीचा फार तिरस्कार करतात. परंतु असे पुरुष एक मिनिट सुद्धा तो त्रास सहन करणार नाही.'
'पुरुषांना जर मासिक पाळी आली असती तर एक न्यूक्लियर वॉर झाला असता' असं मतही जान्हवीने व्यक्त केलं.
दरम्यान जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटाच्या चित्रकरणामध्ये ती व्यस्त आहे.