Apurva Kulkarni
प्राजक्ता माळी हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्राजक्ता माळी 35 वर्षाची अजूनही सिंगल आहे. काही दिवसांपूर्वी तिने आई लग्नासाठी मुलगा शोधत असल्याचं सांगितलं.
प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावर ती नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते.
दरम्यान 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत तिने काही गोष्टी शेअर केल्या आहेत.
'आध्यात्मामुळे माझ्या गरजा खूप कमी झाल्याचं' प्राजक्ता माळीने म्हटलंय.
ती म्हणाली की, 'काहींना शारिरीक, भावनिक, मानसिक गजर असतात. त्यांच्यासाठी लग्न ही गोष्ट सोपी आहे. परंतु अध्यात्मामुळे माझ्या गरजा कमी झाल्या.'
'माझ्या गरजाच संपल्यात तर नातं कोणाच्या आणि कशाच्या जीवावर ते तारणार त्यामुळे मी आईला ही समाजवलं आहे.' असं ती म्हणाली.