Anushka Tapshalkar
गोकुळाष्टमी हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस असून, या दिवशी मथुरा, वृंदावनसह देशभरात विविध प्रकारे मोठा उत्सव साजरा केला जातो. तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल, तर पुढे दिलेल्या ठिकाणांना नक्की भेट द्या.
Shri Krishna Janmashtami
sakal
श्रीकृष्णाचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात मध्यरात्री भव्य पूजा, सजावट आणि धार्मिक कार्यक्रम पाहायला मिळतात.
Mathura, Uttar Pradesh
sakal
श्रीकृष्णाचे बालपण येथे गेल्याची मान्यता आहे. बांके बिहारी आणि इस्कॉन मंदिरात मोठ्या भक्तसमुदायासह फुलांची आकर्षक सजावट आणि अखंड भजनांचा अनुभव घेता येतो.
Vrindavan, Uttar Pradesh
sakal
श्रीकृष्णाचे प्रौढावस्थेतील राज्य म्हणून द्वारकेची ओळख आहे. द्वारकाधीश मंदिरात मध्यरात्री पूजा, आकर्षक शृंगार आणि उत्सवी वातावरण पाहायला मिळते.
Dwarka, Gujarat
sakal
उडुपी श्रीकृष्ण मठात जन्माष्टमीला ‘गोकुळाष्टमी’ म्हणून उत्सव साजरा केला जातो. रथयात्रा, लोककला आणि प्रसिद्ध ‘हुली वेशा’ म्हणजेच व्याघ्र नृत्य हे खास आकर्षण आहे.
Udupi, Karnataka
sakal
मुंबईत गोकुळाष्टमी म्हणजे उत्साहात साजरी होणारी दहीहंडी! रस्त्यांवर मानवी मनोरे तयार करून उंचावर बांधलेली दहीहंडी फोडण्याचा थरार पाहायला मिळतो.
Mumbai, Maharashtra
sakal
मध्यरात्रीचे कृष्णजन्म सोहळे, भजन, मंदिरांची सजावट, रथयात्रा आणि दहीहंडी अशा विविध परंपरांमुळे भारतातील गोकुळाष्टमीचा उत्सव अनुभवण्यासारखा ठरतो.
Best places to visit especially for krishna janmashtami
sakal
Copper Utensils Cleaning Tips
sakal