सकाळ डिजिटल टीम
जन्माष्टमीला उपवास का करतात? किंवा या दिवशी उपवास का कारवा या मागची काय कारणं आहेत जाणून घ्या.
उपवास हे भगवान श्रीकृष्णावरील भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. भक्त या दिवशी स्वतःला पूर्णपणे देवाच्या चरणी समर्पित करतात.
धार्मिक मान्यतेनुसार, जन्माष्टमीचा उपवास केल्याने कळत-नकळत घडलेल्या पापांचे निवारण होते.
असे मानले जाते की, जो भक्त पूर्ण निष्ठेने हा उपवास करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला सुख-समृद्धी मिळते.
श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता. त्यामुळे भक्त दिवसभर उपवास करून मध्यरात्री १२ वाजता पूजा व आरती करून उपवास सोडतात. हा उपवास बाळकृष्णाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी केला जातो.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, उपवास केल्याने शरीराला विश्रांती मिळते. यामुळे पचनसंस्था शुद्ध होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
उपवास केल्याने मन शांत होते आणि ध्यान केंद्रित करण्यास मदत होते. यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
काही लोकांच्या मते, हा उपवास जीवनातील पुनर्जन्म आणि नवीन सुरुवात दर्शवतो, जसे श्रीकृष्ण पुन्हा जन्माला आले.
उपवास केल्याने घरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती टिकून राहते.