Mayur Ratnaparkhe
जपानमधील सत्तारूढ लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाइची यांना आपला प्रमुख नेता म्हणून निवडले आहे.
ताकाइची यांच्या या निवडीबरोबरच, त्या आता जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानही बनणार असल्याचे निश्चित झाले आहे.
लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने ४ ऑक्टोबर रोजी आपल्या नव्या अध्यक्षासाठी निवडणूक घेतली, यामध्ये ताकाइची या विजयी झाल्या आहेत.
या निवडणुकीत प्रमुख लढत ही माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाइची आणि कृषी मंत्री शिंजिरो कोइजुमी या दोन नेत्यांमध्येच होती.
या लढतीत ताकाइची यांनी रनऑफ वोटिंगमध्ये कृषीमंत्री शिंजिरो कोइजुमी(माजी पंतप्रधान जुनिचिरो कोइजुमी यांचे पुत्र) यांना पराभूत केले.
६४ वर्षीय साने ताकाइची या एक रूढीवादी नेत्या मानल्या जातात.
साने ताकाइची अमेरिकेसोबतच्या गुंतवणूक करारांचा आढावा घेण्याचाही सल्ला दिलेला आहे.
याचबरोबर ताकाइची या भारताला विशेष धोरणात्मक भागीदारही मानतात.
ताकाइची यांनी दहा वर्षांत जपानच्या अर्थव्यवस्थेला दुप्पट करण्याची योजना सादर केली आहे.
Rohit Sharma
Sakal