Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली.
Rohit Sharma
Sakal
यावेळी शुभमन गिलला नवा वनडे कर्णधार म्हणून घोषित करताना यापुढे रोहित शर्मा वनडेत केवळ खेळाडू म्हणून खेळेल, असं जाहीर केलं.
Rohit Sharma
Sakal
रोहित शर्माने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असल्याने तो केवळ वनडेत सक्रिय आहे. तसेच आत्तापर्यंत वनडे कर्णधार होता, मात्र आता ही धूरा गिल सांभाळताना दिसेल.
Rohit Sharma
Sakal
त्यामुळे आता रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिका गिलच्या नेतृत्वात खेळणार आहे.
Rohit Sharma
Sakal
रोहितचे भारताचा वनडे कर्णधार म्हणून मोठे योगदान राहिले आहेत. भारताने त्याच्या नेतृत्वात अनेक अविस्मरणीय विजय मिळवण्यासोबत महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत.
Rohit Sharma
Sakal
रोहितने २०१७ ते २०२५ दरम्यान ५६ वनडे सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. यातील ४२ सामने जिंकले, तर १२ सामने पराभूत झाले. तसेच १ सामना बरोबरीत सुटला आणि १ सामन्याचा निकाल लागला नाही.
Rohit Sharma
Sakal
रोहितच्या नेतृत्त्वाच भारताच्या वनडे संघाने २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. याशिवाय २०२३ वनडे वर्ल्ड कपचे उपविजेतेपदही रोहितच्या नेतृत्वात मिळवले.
Rohit Sharma
Sakal
रोहितच्या नेतृत्वात भारताने २०१८ आणि २०२३ सालची वनडे प्रकारात झालेली आशिया कप स्पर्धाही जिंकली आहे.
Rohit Sharma Asia Cup
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Abhishek Sharma | Haval H9 Car price and features
Sakal