जपानने बनवला जगातील पहिला लाकडी उपग्रह! का आहे खास?

Sudesh

मोहीम

जपान आणि अमेरिका मिळून सध्या एका महत्त्वाकांक्षी अवकाश मोहिमेवर काम करत आहेत.

Wooden Satellite | eSakal

लाकडी उपग्रह

जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी हे देश सज्ज झाले आहेत.

Wooden Satellite | eSakal

लिग्नोसॅट

लिग्नोसॅट (LignoSat Probe) असं या उपग्रहाचं नाव आहे. यंदाच्या उन्हाळ्यात हा उपग्रह लाँच करण्यात येईल.

Wooden Satellite | eSakal

कचरा

पृथ्वीभोवतीचा स्पेस-कचरा ही एक मोठी समस्या बनली आहे. यातील कित्येक उपग्रह पृथ्वीवर कोसळण्याचाही धोका असतो.

Wooden Satellite | eSakal

उपाय

या समस्येवर उपाय म्हणून लाकडी उपग्रहांचा वापर करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती.

Wooden Satellite | eSakal

प्रदूषण

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करुन, जळून जाणाऱ्या उपग्रहांमधून अ‍ॅलुमिना कण हवेत पसरतात. हे कण पृथ्वीच्या वातावरणात कित्येक वर्षं टिकून राहतात, ज्यामुळे प्रदूषणाचा धोका आहे.

Wooden Satellite | eSakal

लाकूड

लाकडी उपग्रहामुळे हा धोकाही कमी होणार आहे. लाकूड हे बायोडिग्रेडेबल असल्यामुळे याचा पर्यावरणाला धोका नसल्याचं क्योटो विद्यापीठाच्या संशोधकांनी स्पष्ट केलं.

Wooden Satellite | eSakal

मॅन्गोलिया

लाकडापासून उपग्रह बनवताना सगळ्यात मोठं चॅलेंज हे मजबूत लाकूड शोधणं होतं. यामुळे मग मॅग्नोलिया लाकडाचा (Magnolia Wood) वापर करण्याचा निर्णय घेतला.

Wooden Satellite | eSakal

भारताचा पहिला खासगी हेरगिरी उपग्रह.. का आहे खास?

India Spy Satellite | eSakal