Varsha Balhe
जपानमधील ओसाका शहरात एक अशी इमारत आहे, जिच्या मधून चक्क महामार्ग जातो. या इमारतीचं नाव 'गेट टॉवर बिल्डिंग' आहे.
Japan Gate Tower Building
esakal
ही इमारत एकूण १६ मजल्यांची आहे. विशेष म्हणजे हानशिन एक्स्प्रेसवे या महामार्गाचा काही भाग इमारतीच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यांमधून जातो.
Japan Gate Tower Building
esakal
या इमारतीतून गाड्या वेगाने जात असल्या तरी महामार्गाचा इमारतीला थेट स्पर्श होत नाही. रस्ता स्वतंत्र संरचनेवर बांधण्यात आला आहे.
Japan Gate Tower Building
esakal
या महामार्गामुळे इमारतीतील लोकांना आवाजाचा आणि कंपनांचा त्रास होऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
Japan Gate Tower Building
esakal
या इमारतीची आणखी एक गंमत म्हणजे लिफ्टमध्ये पाचवा, सहावा आणि सातवा मजला अशी बटणं नाहीत. लिफ्ट थेट चौथ्या मजल्यावरून आठव्या मजल्यावर जाते.
Japan Gate Tower Building
esakal
या इमारतीच्या जागेवरून जमीनमालक आणि महामार्ग प्रशासन यांच्यात अनेक वर्षे वाद सुरू होता. अखेर दोघांनीही तडजोड करून इमारतीतून महामार्ग नेण्याचा मार्ग स्वीकारला.
Japan Gate Tower Building
esakal
महामार्गासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेचे भाडेही इमारतीच्या मालकाला दिले जाते. त्यामुळे ही इमारत आजही जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरली आहे.
Japan Gate Tower Building
esakal
Underwater Post Office
esakal