Varsha Balhe
वानूआतू या प्रशांत महासागरातील बेटावर जगातील पहिलं पाण्याखालील पोस्ट ऑफिस आहे. समुद्राच्या तळाशी असलेल्या या पोस्ट ऑफिसमधून पर्यटक पत्रही पाठवू शकतात.
Underwater Post Office
esakal
हे पोस्ट ऑफिस समुद्रात साधारण ३ मीटर खोलीवर आहे. विशेष म्हणजे इथून पाठवलेली पत्रं थेट पाण्यातून प्रवास करत नाहीत.
Underwater Post Office
esakal
या पोस्ट ऑफिसमध्ये सामान्य कागदाऐवजी खास वॉटरप्रूफ पोस्टकार्ड वापरली जातात. पाण्यामुळे अक्षरं पुसली जाऊ नयेत म्हणून त्यावर विशेष मार्करने लिहिलं जातं.
Underwater Post Office
esakal
या पोस्ट ऑफिसमध्ये नेहमीच्या शाईच्या शिक्क्याऐवजी विशेष यंत्राने पोस्टकार्डवर उठावदार शिक्का मारला जातो.
Underwater Post Office
esakal
पत्र पाठवण्यासाठी पर्यटकांना स्नॉर्केलिंग किंवा स्कूबा डायव्हिंग करून समुद्राच्या तळाशी जावं लागतं. तिथे असलेल्या पिवळ्या रंगाच्या लेटरबॉक्समध्ये पोस्टकार्ड टाकलं जातं.
Underwater Post Office
esakal
त्यानंतर प्रशिक्षित डायव्हर समुद्राच्या तळाशी जाऊन लेटरबॉक्समधील पोस्टकार्ड गोळा करतात. पोस्ट ऑफिसच्या ठरलेल्या वेळेनुसार ही पत्रं बाहेर काढली जातात.
Underwater Post Office
esakal
समुद्रातून बाहेर आणल्यानंतर पोस्टकार्ड मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये नेली जातात. तिथे आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ती विमान किंवा जहाजाद्वारे संबंधित पत्त्यावर पाठवली जातात.
Underwater Post Office
esakal
अशा प्रकारे समुद्राच्या तळाशी टाकलेलं पत्र जमिनीवर आल्यानंतर नेहमीच्या टपाल व्यवस्थेद्वारे जगभर पोहोचतं.
Underwater Post Office
esakal
Doll Village
esakal