Pranali Kodre
भारतीय संघाने ९ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात १०१ धावांनी विजय मिळवला.
Team India
Sakal
या सामन्यात जसप्रीत बुमराहने एकाच षटकात डेवाल्ड ब्रेव्हिस आणि केशव महाराज यांना बाद करत २ विकेट्स घेतल्या.
Jasprit Bumrah
Sakal
त्यामुळे बुमराहने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण केल्या. त्याच्यानावावर आता ८१ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १०१ विकेट्स आहेत.
Jasprit Bumrah
Sakal
त्यामुळे बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात १०० विकेट्सचा टप्पा पार करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला, तर जगातील पाचवा खेळाडू आहे.
Jasprit Bumrah
Sakal
बुमराहने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कसोटीमध्ये २३४ विकेट्स, वनडेत १४९ विकेट्स आणि टी२०मध्ये १०१ विकेट्स घेतल्या.
Jasprit Bumrah
Sakal
बुमराहआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात १०० विकेट्सचा टप्पा पार करणाऱ्या चार गोलंदाजांबद्दल जाणून घेऊ.
Jasprit Bumrah
Sakal
श्रीलंकेचा दिग्गज लसिथ मलिंगाने कसोटीत १०१ विकेट्स, वनडेत ३३८ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १०७ विकेट्स घेतल्या आहेत.
Lasith Malinga
Sakal
न्यूझीलंडचा माजी गोलंदाज टीम साऊदीने कसोटीत ३९१ विकेट्स, वनडेत २२१ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १६४ विकेट्स घेतल्या आहेत.
Tim Southee
Sakal
बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने कसोटीत २४६ विकेट्स, वनडेत ३१७ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १४९ विकेट्स घेतल्या आहेत.
Shakib Al Hasan
Sakal
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिद आफ्रिदीने कसोटीत १२१ विकेट्स, वनडेत १३५ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १२६ विकेट्स घेतल्या आहेत.
Shaheen Shah Afridi
Sakal
Mumbai Indians
Sakal