बुमराहच्या १२ वर्षांच्या टी२० कारकि‍र्दीत पहिल्यांदाच 'असं' घडलं!

Pranali Kodre

भारताचा पाकिस्तानवर विजय

आशिया कप २०२५ स्पर्धेत २१ सप्टेंबर रोजी भारतीय संघाने सुपर फोरमध्ये पाकिस्तानला ६ विकेट्सने पराभूत केले.

Team India

|

Sakal

बुमराहची खराब कामगिरी

मात्र असे असले तरी हा सामना भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी मात्र वैयक्तिकरित्या फारसा चांगला राहिला नाही.

Jasprit Bumrah Concedes Most Runs in Powerplay

|

Sakal

बुमराहची गोलंदाजी

बुमराहने या सामन्यात ४ षटकात गोलंदाजी करताना करताना ४५ धावा खर्च केल्या.

Jasprit Bumrah Concedes Most Runs in Powerplay

|

Sakal

पॉवरप्लेमधील स्पेल

विशेष म्हणजे बुमराहने पॉवरप्लेच्या ६ षटकांपैकी ३ षटके गोलंदाजी केली होती. पण त्याने यादरम्यान तब्बल ३४ धावा खर्च केल्या.

Jasprit Bumrah Concedes Most Runs in Powerplay

|

Sakal

सर्वात महागड पॉवरप्लेमधील स्पेल

त्यामुळे बुमराहच्या १२ वर्षांच्या टी२० क्रिकेट कारकि‍र्दीत पॉवरप्लेच्या स्पेलमध्ये पहिल्यांदाच इतक्या जास्त धावा दिल्या. ही त्याची सर्वाधिक पॉवरप्लेमधील महागडी स्पेल ठरली.

Jasprit Bumrah Concedes Most Runs in Powerplay

|

Sakal

२०१६ नंतर पहिल्यांदाच महागडी स्पेल

त्याने यापूर्वी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नला झालेल्या टी२० सामन्यांत पॉवरप्लेमध्ये ३१ धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदात तो २१ सप्टेंबरला पॉवरप्लेमध्ये इतका महागडा ठरला.

Jasprit Bumrah Concedes Most Runs in Powerplay

|

Sakal

बुमराहच्या टी२० विकेट्स

बुमराहने २०१३ मध्ये वरिष्ठ स्थरावर गुजरातकडून महाराष्ट्र विरुद्ध टी२० मध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या संपूर्ण टी२० कारकि‍र्दीत आत्तापर्यंत २४८ सामने खेळले असून ३१६ विकेट्स घेतल्या आहेत.

Jasprit Bumrah Concedes Most Runs in Powerplay

|

Sakal

'मॅच हरलो, युद्ध जिंकलो,' म्हणणारी हॅरीस रौफची पत्नी आहे तरी कोण?

Who is Haris Rauf wife Muzna Masood Malik

|

Sakal

येथे क्लिक करा