भारताकडून इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीत कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-५ गोलंदाज

Pranali Kodre

लॉर्ड्स कसोटी

भारत आणि इंग्लंड संघात १० ते १४ जुलै दरम्यान लॉर्ड्सवर कसोटी मालिकेतील तिसरा सामना पार पडला.

Jasprit Bumrah | Sakal

बुमराहच्या ७ विकेट्स

या सामन्यात जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात ५ विकेट्स आणि दुसऱ्या डावात २ विकेट्स असे मिळून ७ विकेट्स घेतल्या.

Jasprit Bumrah | Sakal

बुमराहचा विक्रम

त्यामुळे आता बुमराह इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

Jasprit Bumrah | Sakal

पहिला क्रमांक

बुमराहने इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत १० सामने खेळताना ४९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने याबाबतीत इशांत शर्माला मागे टाकले.

Jasprit Bumrah | Sakal

इशांत शर्मा

इशांत शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये १४ कसोटी सामन्यांत ४८ विकेट्स घेतल्या आहेत.

Ishant Sharma | Sakal

कपिल देव

भारताचे दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांनी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये १३ कसोटी सामन्यांमध्ये ४३ विकेट्स घेतल्या होत्या.

Kapil Dev | Sakal

अनिल कुंबळे

दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याने इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध १० कसोटी सामन्यांत ३६ विकेट्स घेतले होते. या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.

Anil Kumble | Sakal

बिशनसिंग बेदी

या यादीत ५ व्या क्रमांकावर बिशनसिंग बेदी आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये १२ कसोटी सामन्यांत ३५ विकेट्स घेतल्या आहेत.

Bishan Singh Bedi | Sakal

MS Dhoni चे तणाव मुक्त रहाण्याचं सिक्रेट काय? जाणून घ्या ५ खास टीप्स

MS Dhoni | Sakal
येथे क्लिक करा