Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ६ एप्रिल रोजी गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला ७ विकेट्सने पराभूत केले.
गुजरातच्या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने मोलाचा वाटा उचलला.
त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना ४ षटकात १७ धावाच खर्च करताना ४ विकेट्स घेतल्या.
सिराजने आयपीएलमध्ये एकाच डावात ४ विकेट्स घेण्याची ही तिसरी वेळ आहे.
त्यामुळे सिराज आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा एकाच डावात ४ विकेट्स घेणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
अर्शदीप सिंगनेही आयपीएलमध्ये एका डावात तीनवेळा ४ विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह, लक्ष्मीपती बालाजी, मोहित शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे चौघे संयुक्तरित्या आहेत. या चौघांनीही प्रत्येक ४ वेळा एका डावात ४ विकेट्स घेतल्यात.
आकडेवारी ६ एप्रिल २०२५ पर्यंतची आहे.