बुमराहच्या लेकाची वानखेडे स्टेडियमवर हजेरी, फोटो व्हायरल

प्रणाली कोद्रे

इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील ५५ वा सामना ६ मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला.

MI vs SRH | X/IPL

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यादरम्यान खेळाडूंच्या कामगिरीबरोबर जसप्रीत बुमराहच्या मुलानेही सर्वांचे लक्ष वेधले.

Jasprit Bumrah | X/IPL

या सामन्यासाठी बुमराहची पत्नी आणि स्पोर्ट्स प्रेझेंटेटर संजना गणेशन त्यांचा ८ महिन्यांचा मुलगा अंगदसह स्टडियममध्ये उपस्थित होती.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan Son | X

यावेळी सामना सुरू असताना त्यांच्यावरही कॅमेरा गेल्याने बुमराहच्या मुलाची झलक सर्वांना पाहायला मिळाली.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan Son | X

संजना आणि बुमराह यांना सप्टेंबर २०२३ मध्ये मुलगा झाला आहे. दरम्यान, त्यांनी अद्याप त्याचा चेहरा दाखवलेला नव्हता.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan Son | Instagram

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हा सामना ज्या दिवशी झाला म्हणजेच ६ मे रोजी संजनाचा वाढदिवसही आहे. तिच्यासाठी बुमराहने एक खास पोस्टही केली होती.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan | Instagram

संजना आणि बुमराह यांचे मार्च २०२१ मध्ये लग्न झाले आहे.

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan | Instagram

'तू मला पूर्ण...' बुमराहच्या पत्नी संजनाला वाढदिवसाच्या रोमँटिक शुभेच्छा

Jasprit Bumrah-Sanjana Ganesan | Instagram