सकाळ डिजिटल टीम
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा सामूहिक सोज्वळ स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वामुळे बच्चन कुटुंब प्रसिद्ध आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या हा कुटुंबाचा अविभाज्य भाग बनली आहे.
काही वर्षांपूर्वी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात जया बच्चन यांनी ऐश्वर्या रायचं खास कौतुक केलं.
जया यांनी म्हटलं, "मी एका सुंदर मुलीची सासू बनले आहे, जी मूल्य आणि प्रतिष्ठेने परिपूर्ण आहे. तिचं हसणं मला खूप आवडतं."
जया यांच्या या शब्दांनी ऐश्वर्या भावुक झाली आणि डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, हा क्षण भावूक होता.
ऐश्वर्या आणि जया यांच्या नात्याबद्दल असलेल्या तर्कवितर्कांना या व्हिडिओमुळे पूर्णविराम मिळाला आहे.
जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे.
चाहत्यांनी या व्हिडिओला भरभरून कौतुक केलं असून, ऐश्वर्या-जया यांच्या नात्याचं महत्त्व अधोरेखित करणारा हा प्रसंग आहे.