Mr. IPL सुरेश रैनाच्या नावावर असणारे 'हे' रेकॉर्ड्स माहित आहेत का?

Pranali Kodre

सुरेश रैना

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सुरेश रैनाचा जन्म २७ नोव्हेंबर १९८६ रोजी उत्तरप्रदेशमधील गाजियाबाद येथे झाला. तो भारताचा मधल्या फळीतील एक स्फोटक फलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही ओळखला जातो.

Suresh Raina | Cricket Records | Sakal

मिस्टर आयपीएल

याशिवाय आयपीएलमध्ये त्याने केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखले जाते. रैनाने त्याच्या कारकि‍र्दीत काही खास विक्रमही केले आहेत, त्यावर एक नजर टाकू.

Suresh Raina | Cricket Records | Sakal

टी२० वर्ल्ड कपमधील शतक

सुरेश रैनाने २०१० टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केले होते. तो त्यावेळी टी२० वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला होता.

Suresh Raina | Cricket Records | Sakal

पहिलाच भारतीय

रैनाने २०१० मध्ये जेव्हा त्याच्या कसोटी पदार्पणात कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध शतक केले, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिलाच भारतीय ठरला होता. त्याने त्याआधी वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये शतक केले होते.

Suresh Raina | Cricket Records | Sakal

CSK साठी सर्वाधिक सलग सामने

रैना एकाच संघासाठी टी२० मध्ये सलग सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स संघासाठी सलग १५८ टी२० सामने खेळले आहेत.

Suresh Raina | Cricket Records | Sakal

पहिला खेळाडू

सुरेश रैना आयपीएलमध्ये ५००० धावा करणारा पहिला खेळाडू होता.

Suresh Raina | Cricket Records | Sakal

आयपीएलमधील झेल

सुरेश रैना आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांमध्ये १०९ झेलांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Suresh Raina | Cricket Records | Sakal

९ वेळा ४०० पार

रैनाने आयपीएलमध्ये तब्बल ९ हंगामात ४०० धावांचा टप्पा पार केला आहे.

Suresh Raina | Cricket Records | Sakal

तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा

सुरेश रैनाने आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक ४९३४ धावा केल्या आहेत. आजही त्याच्या नावावर हा विक्रम आहे.

Suresh Raina | Cricket Records | Sakal

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

रैनाने १८ कसोटी सामन्यांमध्ये ७६८ धावा केल्या आहेत, तर १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने २२६ वनडे सामन्यांत ५६१५ धावा केल्या आहेत, तर ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १६०५ धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही क्रिकेट प्रकारात ६२ विकेट्स घेतल्या आहेत.

Suresh Raina | Cricket Records | Sakal

आयपीएल कारकिर्द

रैनाने आयपीएलमध्ये २०५ सामन्यांमध्ये ५५२८ धावा केल्या होत्या, तर २५ विकेट्स घेतल्या आहेत.

Suresh Raina | Cricket Records | Sakal

CSK मध्ये महाराष्ट्राच्या आणखी दोन खेळाडूंचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Tripathi - Ruturaj Gaikwad | Sakal
येथे क्लिक करा