Apurva Kulkarni
आवाज बुलंद राहावा म्हणून अनेक गायक दैनदिन आहारात काहीतरी वेगळं खात असतात. परंतु अमेरिकेची एक गायक आवाजासाठी चक्क सापांच्या स्पर्म पिते.
अमेरिकेतील प्रसिद्ध सिंगर जेसिका सिम्पसन हिने एका मुलाखतीत तिच्या सीक्रेट ड्रिंकबाबत मोठा खुलासा केला आहे.
तिने म्हटलं की, 'आवाज बुलंद राहावा यासाठी चिनी आयुर्वेदिक पदार्थापासून बनलेलं कॉकटेलचं पाणी पिते. ज्यामध्ये सापाचं स्पर्म असतं.'
जेसिकाने सांगितलं की, 'या ड्रिंकबद्दल त्यांना त्यांच्या कोचने माहिती दिली होती. त्यामुळे ती ते पेय पिते.'
जेसिकाने सापच्या स्पर्मची तुलना मधासोबत केली आहे. तिच्यामते या स्पर्ममुळे तिचा आवाज बुलंद राहणार आहे.
जेसिकाच्या मते, 'जर तुम्हाला तुमचा आवाज चांगला व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही सापाचं स्पर्म पिलं पाहिजे.'
माहितीनुसार अभिनेत्री किम कार्दशियन आणि जेनिफर एनिस्टर सुद्धा चेहरा चमदार राहावा म्हणून सापाच्या स्पर्मचं सेवन करतात.