kimaya narayan
बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांची चर्चा आजही असते. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत असतात.
रेखा यांचं वैयक्तिक आयुष्य कायमच वादग्रस्त राहिलंय. अनेक अभिनेत्यांशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं. त्यातीलच एक नाव होतं सुनील दत्त.
सुनील यांचं लग्न नर्गिस यांच्याशी झालं होतं. त्या बॉलिवूडमधील एक दिग्गज अभिनेत्री होत्या. याशिवाय बॉलिवूडमध्येही त्यांचं खूप वजन होतं.
सुनील दत्त यांनी रेखाबरोबर 'ये आग कब बुझेगी' आणि 'प्राण जाये पर वचन ना जाये' या सिनेमांमध्ये काम केलं.
याचवेळी त्यांचं अफेअर असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे नर्गिस खूप चिडल्या होत्या.
इतकंच नाही संजय दत्तशीही रेखा यांचं जोडलं गेलं. त्यांचं लग्न झाल्याचीही चर्चा होती. पण तुम्हाला माहितीये का ? नर्गिस यांनी रेखा यांना चक्क शिवीगाळ केली होती.
नर्गिस यांनी एका मुलाखतीत "रेखा पुरुषांना असे सिग्नल देत असे जणू ती सहज उपलब्ध आहे. तर काही लोकांच्या नजरेत ती एखाद्या चेटकीणपेक्षा कमी नाही. कधीकधी मला असं वाटतं की मी रेखाला समजून घेऊ लागले आहे. पण आता मला तिची समस्या समजली आहे." असं म्हटलं होतं.