दागिने चोरी गेले तर इन्शुरन्स मिळतो का? ही माहिती वाचवेल तुमची लाखोंची गुंतवणूक!

सकाळ डिजिटल टीम

दागिन्यांची मोठी मागणी

लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात सोनं-हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी जोरात वाढली आहे. पण एवढे महाग दागिने खरेदी करूनही बहुतेक लोक इन्शुरन्स (विमा) घेत नाहीत.

Gold demand 

|

Sakal

इन्शुरन्स न घेतल्यामुळे धोका

इन्शुरन्स न घेतल्यामुळे चोरी, नुकसान किंवा इतर गोष्टींमुळे तुमचे दागिने तुम्ही गमाऊ शकता.

Gold Stolen Insurance

|

Sakal

सोन्याचा भाव उच्चांकावर

2025 सप्टेंबर तिमाहीत दागिने उद्योगात 20% वाढ झाली असून भारताच्या GDP मध्येही तब्बल 7% वाटा आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचा भावही ₹1.25 लाख प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.

Gold Rate 

|

Sakal

ज्वेलरी इन्शुरन्स आवश्यक

त्यामुळे सध्याच्या काळात सोन्याच्या वाढत्या किमती आणि मागणीमुळे ज्वेलरी इन्शुरन्स आता अत्यावश्यक झाला आहे.

Gold demand 

|

Sakal

ज्वेलरी इन्शुरन्समध्ये काय कव्हर होते ?

सोने, हिरे आणि मौल्यवान दागिन्यांचे संपूर्ण किंमत यात कव्हर होते. तसेच डिजिटल क्लेम आणि ऑनलाइन पॉलिसी व्यवस्थापनाची सुविधा आहे.

Gold coverage 

|

Sakal

95% पर्यंत रक्कम मिळणार

यात आग, चोरी, अपघाती नुकसान, पूर किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान झाल्यास संरक्षण मिळते. तुम्हाला दागिन्याच्या 95% किंमतीपर्यंत रक्कम मिळू शकते.

gold return

|

Sakal

व्यक्तिगत दागिन्यांनाही कव्हर

लग्नात घातलेले, घरी ठेवलेले किंवा प्रवासात बरोबर असलेले दागिने या
सगळ्यांसाठी पर्सनल ज्वेलरी इन्शुरन्स उपलब्ध आहे.

Personal Gold 

|

Sakal

लग्नसराईत इन्शुरन्स का महत्त्वाचा?

कारण या काळात सर्वाधिक दागिने वापरली जातात. लाखोंची ज्वेलरी घरात ठेवली जाते त्यामुळे धोका असतो.

high gold use 

|

Sakal

Vehicle insurance 1

|

sakal

Insurance : वाहन इन्शुरन्स का इतका महत्त्वाचा? जाणून घ्या वाहन इन्शुरन्सचे स्मार्ट फायदे