सकाळ डिजिटल टीम
नानासाहेब पेशवे यांच्या पत्नीच्या अकाली निधनानंतर आईविना वाढलेली त्यांची कन्या मैनावती ही जात्याच हुशार अन् इंग्रजी भाषेचे ज्ञान असणारी होती.
Mainavati Peshwa
sakal
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी पेन्शन नाकारल्याने नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध १८५७ च्या लढ्यात नेतृत्व केले.
Mainavati Peshwa
sakal
युद्धाच्या काळात बंडखोरांपासून इंग्रज महिला आणि बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी नानासाहेबांनी त्यांना आपल्या वाड्यात आश्रय देऊन मान-सन्मान दिला.
Mainavati Peshwa
sakal
आपल्या घराण्याच्या उच्च परंपरेनुसार मैनावतीने स्वतः इंग्रज अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षितपणे ब्रिटिश छावणीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली.
Mainavati Peshwa
sakal
ब्रिटिश सैन्याने कानपूर आणि बिठूरवर पुन्हा ताबा मिळवला, ज्यामुळे नानासाहेब पेशव्यांना अज्ञातवासात जावे लागले अन् वाड्यात केवळ १४ वर्षांची मैनावती राहिली.
Mainavati Peshwa
sakal
इंग्रज सेनापती थॉमस तोफांनी वाडा उडवायला आला असता मैनावतीने धैर्याने पुढे येत जड वाड्याचा काय अपराध, असा प्रश्न इंग्रजीत विचारून त्याला स्तब्ध केले.
Mainavati Peshwa
sakal
इंग्लंडच्या लंडन सभेतून नानासाहेबांचा पत्ता विचारण्याचा आणि माहिती न दिल्यास मैनावतीला थेट मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा अतिशय अमानुष आदेश देण्यात आला.
Mainavati Peshwa
sakal
ज्या इंग्रज कुटुंबांना मैनावतीने प्राणांची बाजी लावून वाचवले होते, त्यांच्याच सरकारने दया न दाखवता तिच्यावर नानासाहेबांचा पत्ता सांगण्यासाठी अमानुष अत्याचार केले.
Mainavati Peshwa
sakal
अथांग धैर्य दाखवणाऱ्या मैनावतीने तोंडातून अवाक्षरही न काढल्याने कानपूरच्या कमिशनरने संपूर्ण शहरासमोर तिला झाडाला बांधून जिवंत जाळण्याची क्रूर शिक्षा दिली.
Mainavati Peshwa
sakal
दहशत बसवण्यासाठी ब्रिटिशांनी केलेल्या या अतिशय भीषण कृत्यामुळे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात १४ वर्षांची निष्पाप मैनावती पेशवे हुतात्मा म्हणून अमर झाली.
Mainavati Peshwa
sakal
नेपाळ देशात चिमुकल्या मुलींची 'कुमारी पूजा' का केली जाते?
Sacred Girl Worship Ritual in Nepal
sakal