संतोष कानडे
ज्यांनी भारतापासून पाकिस्तान वेगळा केला त्या मोहम्मद अली जिन्नांचा मुंबईत अलिशान बंगला आहे
जिन्ना यांनी १९३६ मध्ये मुंबईतील मलाबार हिल इथं अडीच एकर परिसरात आलिशान बंगला बांधला होता
साऊथ कोर्ट असं या बंगल्याचं नाव आहे. या बंगल्याची आजची किंमत जवळपास एक हजार कोटी इतकी आहे.
जिन्ना यांच्या या घराचं डिझाइन क्लाउड बेटली यांनी केलं होतं. ते जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख होते.
जिन्ना यांची मुलगी दिना वाडिया यांनी २००७ मध्ये या बंगल्याच्या मालकी हक्कासाठी याचिका दाखल केली होती.
दिना वाडिया यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी नुस्ली वाडिया यांना कोर्टाने याचिका पुढे नेण्यात परवानगी दिली होती.
मात्र हा बंगला एका निष्कासित संपत्तीमघ्ये गणला जातो. १ मार्च १९४७ नंतर भारत सोडून गेलेल्या व्यक्तींच्या मालमत्तांचा या समावेश होतो.
मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटीने ऑगस्ट २०२३ मध्ये वारसा स्थळाच्या दुरुस्तीसाठी मंजुरी दिली होती.
परराष्ट्र मंत्रालयाने हे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवलं आहे.