रश्मिका-विजयचं बाँडिंग बघा! लग्नाचे फोटो झाले व्हायरल

संतोष कानडे

रश्मिका मंदाना

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा गुरुवारी विवाह सोहळा संपन्न झाला. अनेक वर्षांच्या प्रेमानंतर दोघांनी लग्न केलं.

विजय देवरकोंडा

रश्मिका आणि विजय यांचा विवाह दोनवेळा झाला. विजयकडून तेलुगू पद्धतीने आणि रश्मिकाकडून कोडवा पद्धतीने.

ग्रँड रिसेप्शन पार्टी

या लग्नाच्या विधी चार दिवसांपासून सुरु होता. लग्नानंतर रात्री ग्रँड रिसेप्शन पार्टी होस्ट करण्यात आली होती.

उदयपूर

हा विवाह सोहळा उदयपूरपासून जवळ २५ किलोमीटर दूर अरावलीच्या टेकड्यांमध्ये असलेल्या आयटीसी मोमेंटोसमध्ये पार पडला.

VIROSH

रश्मिका आणि विजयने आपल्या विवाह सोहळ्याला VIROSH असं नाव दिलं होतं.

पुष्पा

रश्मिकाने पुष्पा, सिकंदर, छावा असे गाजलेले चित्रपट केले तर विजयने अर्जून रेड्डीसारख्या चित्रपटातून नाव कमावलं.

साखरपुडा

ऑक्टोबर २०२५ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. हे त्यांनी ऑफिशियली सांगितलेलं नव्हतं.

नेटवर्थ

मीडिया रिपोर्ट्नुसार, रश्मिका आणि विजय या दोघांचं नेटवर्थ १३० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

जुबली हिल्स

एकट्या विजय देवरकोंडाचं नेटवर्थ ६६ ते ७० कोटी रुपये इतकं आहे. त्याचा हैदराबादच्या जुबली हिल्स येथे १५ कोटी रुपयांचा लग्झरी बंगला आहे.

एसटीच्या ताफ्यात नव्याकोऱ्या बस

येथे क्लिक करा