Saisimran Ghashi
ते एक पराक्रमी योद्धा होते, ज्यांनी शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले, म्हणूनच “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही प्रसिद्ध म्हण अस्तित्वात आली.
शिवरायांनी आपल्या अनेक वीर व निडर मावळ्यांच्या मदतीनं प्रचंड मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं.
परंतु, स्वराज्य निर्माण करताना अनेक मौल्यवान रत्न गमवावे लागले. अशा वीर मर्द मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं.
जिवाजी महाले हे एक वीर लढवय्ये होतेच, या व्यतिरिक्त ते छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षकही होते
जिवा महालेंचे वंशज प्रकाश सपकाळ (महाले) हे सध्या 14 व्या पिढीत असून ते अनेक वर्षांपासून पक्षाघाताने अंथरुणाला खिळलेले आहेत.
त्यांच्या पत्नी जयश्री या शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत व आपल्या दोन मुलांना, प्रतीक आणि प्रतीक्षा यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढवले आहे.
जिवा महालांचे वंशज महाबळेश्वरमधील कोंढवली गावी राहात आहेत.
प्रतीक्षा महाले हिच्या विवाहासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांनी याची दखल घेत मदतीचा हात पुढे केला होता