Shubham Banubakode
राष्ट्रध्यक्ष म्हणून जो बायडेन यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.
बायडेन यांच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम बघणार आहेत.
आज २० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी आहे.
अशातच निवृत्तीनंतर बायडेन यांना किती निवृत्तीवेतन आणि कोणत्या सुविधा मिळतील, याची चर्चा सुरु आहे.
अमेरिकेत माजी राष्ट्रपती कायदा आहे. या कायद्यानुसार माजी राष्ट्रपतींना निवृत्तीवेतन आणि सुविधा दिल्या जातात.
अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना माजी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आरोग्य विम्यासंबंधित लाभ दिले जातात.
याशिवाय माजी राष्ट्राध्यक्षांना कॅबिनेट सचिवांप्रमाणे वार्षिक पेन्शन दिली जाते.
सद्यस्थिती अमेरिकेत कॅबिनेट सचिवांना २४६,४२४ डॉलर इतका पगार आहे.
भारतीय चलनानुसार बोलायचं झाल्यास जो बायडेन यांना २ कोटी ४ लाख ७३ हजार २१२ रुपये इतकी वार्षिक पेंशन मिळेल.
जो बायडेन यांना काही कर्मचाऱ्यांचा स्टाफही दिला जातो.
याशिवाय माजी राष्ट्राध्यक्षांना कार्यालयीन खर्च, टेलीफोन बिल, प्रवास खर्च यासह इतर भत्तेही दिले जातात.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांना २०१६ ते २०२४ दरम्यान निवृत्तीवेतन म्हणून $२४१८००० मिळाले होते.