हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास टाळण्यासाठी काय करावे?

सकाळ वृत्तसेवा

सांधेदुखी

थंड हवामान आणि दमट वातावरणामुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो. रक्तवाहिन्या आकुंचित होऊन रक्तप्रवाह कमी होतो, त्यामुळे हिवाळ्यात वेदना वाढतात.

joint pain | Sakal

आजार

संधिवात, ऑस्टिओआर्थ्रायटिस, रुमेटॉइड आर्थ्रायटिस सारख्या आजारांची हिवाळ्यात लक्षणे तीव्र होतात. मेंदू सांधेदुखीला अधिक तीव्रतेने प्रतिसाद देत असतो.

joint pain | Sakal

उपाय

उष्ण कपडे, गरम पाण्याच्या पिशव्या यांचा वापर करावा. हलका व्यायाम, स्ट्रेचिंग किंवा योगासने सांधेदुखीसाठी उपयुक्त ठरतात.

Solution | Sakal

पोषण

हळदीचे दूध, आले, ओमेगा-३ फॅटी ॲसिड यांचा आहारात समावेश करा. अँटी-इन्फ्लेमेटरी पदार्थांचे सेवन करावे.

nutrition | Sakal

स्नायूंची मसाज

कोरफड जेल सांधेदुखीच्या सूज कमी करण्यास मदत करते. गरम तेलाने (मोहरीचे तेल, नारळ तेल) मसाज केल्याने सांधेदुखी कमी होते.

Muscle massage | Sakal

फिजिओथेरपी

फिजिओथेरपीसारख्या उपायांचा विचार करा व सूर्यप्रकाशात वेळ घालवल्याने हाडे व सांधे मजबूत होतात.

Physiotherapy | Sakal

योगा

वृक्षासन, वज्रासन, मकरासन, सेतुबंधासन यासारखी योगासने सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. गरम पाण्याच्या तलावात पोहणे, हलके सायकल चालवणे सांधेदुखीला आराम देतात.

yoga | sakal

आहार

भोपळा, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पालेभाज्या, सोयाबीन, डाळी, अंडी खावी व गुळाचाही थोडा प्रमाणात आहारात समावेश करा.

diet | sakal

अँटिबायोटिक्स घेताय? आरोग्यावर होतात 'हे' वाईट परिणाम

antibiotic | Sakal
येथे क्लिक करा