Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सध्या ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान खेळवला जात आहे. हे या स्पर्धेचे १० वे पर्व असून यापूर्वी ९ वेळा यशस्वीपणे ही स्पर्धा पार पडली आहे.
Player Of The Tournament in T20 World Cup
Sakal
२००७ साली सुरू झालेल्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत आत्तापर्यंत अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. पण एक असा विक्रम आहे, जो केवळ विराट कोहलीच्या नावावर आहे.
Virat Kohli
Sakal
विराट कोहली टी२० वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा मालिकावीर पुरस्कार (Player of the Tournament) जिंकणारा जगातील एकमेव खेळाडू आहे.
Virat Kohli
Sakal
विराट कोहलीने २०१४ आणि २०१६ साली झालेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकला होता.
Virat Kohli
Sakal
याशिवाय ७ खेळाडू असे आहेत ज्यांनी प्रत्येकी १ वेळा आत्तापर्यंत टी२० वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे.
Player Of The Tournament in T20 World Cup
Sakal
यामध्ये शाहीद आफ्रिदी, तिलकरत्ने दिलशान, केविन पीटरसन, शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर, सॅम करन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे.
Player Of The Tournament in T20 World Cup
Sakal
विशेष म्हणजे टी२० वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकलेल्या खेळाडूंमधील केवळ सॅम करन आणि जसप्रीत बुमारह सध्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत.
Jasprit Bumrah
Sakal
त्यामुळे विराटचा दोनवेळा मालिकावीर जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी सध्या केवळ सॅम करन आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूकडे आहे.
Sam Curran
Sakal
Suryakumar Yadav
Sakal