Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड संघात टी२० मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारीला कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये खेळवण्यात आला.
या सामन्यात इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने एकाकी झुंज देताना अर्धशतक झळकावले.
बटलरने ४४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला २० षटकात सर्वबाद १३२ धावांपर्यंत पोहचता आले.
दरम्यान, बटलरने या अर्धशतकासह ट्वेंटी-२० कारकिर्दीत १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
बटलर ट्वेंटी-२० मध्ये १२ हजार धावांचा टप्पा पार करणारा जगातील सातवा, तर इंग्लंडचा दुसराच फलंदाज आहे.
याआधी इंग्लंडच्या ऍलेक्स हेल्स याने ट्वेंटी-२० मध्ये १३३६१ धावा केल्या आहेत.
याशिवाय बटलरने भारताविरुद्ध टी२० मध्ये ५० पेक्षा जास्त धावांची खेळी करण्याची ही पाचवी वेळ आहे.
त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत निकोलस पूरनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.