Pranali Kodre
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट लीने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे विजय त्याच्या संघांना मिळवून दिले आहेत.
त्याची गोलंदाजी स्टाईलनेही अनेक फलंदाजांच्या मनात धडकी भरायची. त्यामुळे अनेक जण त्याच्या गोलंदाजी स्टाईलची कॉपीही करतात
आता भारतातील लहानग्या मुलाचा ब्रेट लीच्या स्टाईलने गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा लहान मुलगा गोलंदाजी करताना अगदी हुबेहुब ब्रेट लीच्या गोलंदाजी स्टाईल प्रमाणे गोलंदाजी करताना दिसतोय. त्याचं वय ७ वर्षांचं असल्याचे समजत आहे.
या ७ वर्षीय लहान मुलाची गोलंदाजी पाहून अनेकांनी त्याचे कौतुकही केले आहे.
ब्रेट लीने ऑस्ट्रेलियासाठी १९९९ ते २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.
त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७६ कसोटीत ३१० विकेट्स घेतल्या, त्याने २२१ वनडेत ३८० विकेट्स घेतल्या. तसेच त्याने २५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २८ विकेट्स घेतल्या आहेत.
ब्रेट ली २००३ वनडे वर्ल्ड कप, २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २००९ चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचाही भाग राहिला आहे.