Anushka Tapshalkar
आपल्या सोज्वळ संगीतासाठी आणि भावनिक सुसंवादासाठी ओळखलया जाणाऱ्या जुबिन नौटियाल बद्दल नुकतीच एक माहिती समोर आली आहे.
प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल याने मढ आयलंड येथील रहेजा एक्झोटिका प्रकल्पात 4 बेडरूमचे सीफ्रंट स्कायप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे.
1,933 चौरस फूटांमध्ये विस्तारलेल्या या अपार्टमेंटची किंमत ₹5 कोटी आहे.
जुबिन सोबत अभिनेता विक्रांत मेस्सी, पंकज त्रिपाठी आणि अर्चना पूरण सिंग हे आता एकमेकांचे शेजारी असणार आहेत.
निवांत किनारी जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या मढ आयलंडमध्ये रहेजा एक्झोटिका हे ३२ एकर आयलंड-रिसॉर्टमध्ये स्थित आहे.
या प्रकल्पात 350 फूट उंचीवरील फ्लोटिंग क्लब, इनफिनिटी स्काय पूल, स्काय लाउंज आणि स्काय जिमसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत.
दोन वर्षांत रहेजा एक्झोटिकातील घरांच्या किंमती ₹28,500-31,000 प्रति चौरस फूटपर्यंत वाढल्या आहेत, पण तरीही हे वर्सोवा पेक्षा स्वस्त आहे.
जुबिन नौटियालच्या शांत आणि कलात्मक सवडीनुसार हे शांत आणि सुंदर ठिकाण योग्य आहे.