Apurva Kulkarni
ठरलं तर मग मालिकेतून घराघरात पोहचलेली सायली म्हणजेच जुई गडकरी हिचा मोठा चाहतावर्ग आहे.
जुई गडकरी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
दरम्यान सई सध्या अभिनयासोबतच तिचं मास्टर्सचं शिक्षण सुद्धा घेत आहे.
नुकतच सईने एक अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली की, ती 'उद्योजकता'मध्ये मास्टरेटच शिक्षण घेतेय.
दरम्यान जुईच्या चाहत्यांना ती मास्टर्सचं शिक्षण का घेते? आणि शुटिंग आणि अभ्यास कसा करते? याचा प्रश्न पडला होता.
यावर जुईने उत्तर देत म्हटल की, 'मला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. म्हणून मी दुसरी मास्टर्स डिग्री उद्योजकतामध्ये घेणार आहे.'
शेड्युल कसं मॅनेज करते? याचं उत्तर देताना ती म्हणाली की, '१२ तास शुटिंग करुन मी सुद्धा दमते.
'परंतु प्रेक्षकांमुळे मला एनर्जी मिळते. त्यामुळे मला अभ्यास आणि अभिनय दोन्ही जमतं'
'नवीन काहीतरी करण्याची उर्जा प्रेक्षकांच्या प्रेमातून मला सतत मिळते. त्यामुळे नव्या जोमाने मी काम करु शकते.'