एका पोर्तुगीज बाईमुळे 'हा' मुघल देशाचा सम्राट बनला

संतोष कानडे

आग्र्यात जन्मलेली पोर्तुगीज कन्या

ज्युलियानाचा जन्म १६४५ मध्ये आग्र्यात झाला. तिचे वडील ऑगस्टिन्हो डायस दा कोस्टा मुघल दरबारात वैद्यकीय सेवेत होते.

गुलामीतून दरबारात प्रवेश

१६३२ मध्ये शाहजहानच्या हल्ल्यानंतर तिचं कुटुंब आग्र्यात आणलं गेलं. वडील वैद्यक ज्ञानामुळे दरबारात रुजू झाले.

औरंगजेबाच्या पत्नीच्या सेवेत

ज्युलियाना नवाब बाईच्या सेवेत रुजू झाली आणि लवकरच तिचं स्थान मुघल दरबारात वाढू लागलं.

प्रिन्स मुअज्जमची गुरू बनली

औरंगजेबाने तिला आपल्या मुलगा मुअज्जमची (पुढील बहादूरशहा) शिक्षिका नेमले. दोघे जवळ आले, आणि प्रेम फुललं.

बंदिवासातही सोबत

१६८७ मध्ये नवाब बाई व मुअज्जमला कैद करण्यात आलं. ज्युलियानाही त्यांच्याबरोबर राहिली. तिची निष्ठा प्रकट झाली.

युद्धात उतरलेली योद्धा

१७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सिंहासनासाठी लढाई झाली. ज्युलियानाने बहादूरशहाला पोर्तुगीज सैनिकांसह साथ दिली.

रणांगणात हत्तीवर स्वार!

ज्युलियानाने हत्तीवर स्वार होऊन रणांगणात सहभाग घेतला. बहादूरशहा सम्राट झाला.

ख्रिश्चनांची रक्षक

तिला शाही पदवी, संपत्ती व दारा शिकोहचा राजवाडा मिळाला. ख्रिश्चनांना जिझिया करातून सूट मिळवून दिली.

शेवटपर्यंत निष्ठावान

१७१२ मध्ये बहादूरशहाचा मृत्यू झाला. पण ज्युलियाना शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या सोबत होती. तिचं प्रेम व निष्ठा अद्वितीय होती.

काश्मिरी महिलांच्या अंतर्वस्त्राबद्दल औरंगजेबाने लावला होता नियम

येथे क्लिक करा