सुगंध आणि रंगांची उधळण ! 'ही' आहेत जुलै महिन्यात बहरणारी मनमोहक फुले...

सकाळ डिजिटल टीम

'लेमन क्वीन' सूर्यफूल (Lemon Queen Sunflower)

हे सूर्यफूल चक्क ८ फुटांपर्यंत वाढते. जुलैपासून ते थेट हिवाळ्याच्या सुरुवातीपर्यंत याला फिकट पिवळ्या रंगाची सुंदर फुले येतात.

Lemon Queen Sunflower

|

sakal 

बटरफ्लाय मिल्कवीड (Butterfly Milkweed)

गडद नारंगी आणि लाल रंगाची ही फुले मैदानांमध्ये चमकताना दिसतात. मोनार्क आणि क्वीन फुलपाखरांसाठी हे एक महत्त्वाचे आश्रयस्थान आहे.

Butterfly Milkweed

|

sakal 

डेलिली (Daylily)

जुलै महिन्याच्या उन्हात ही फुले बागेला एक वेगळाच लूक देतात. त्यांचे रंग आणि नाजूकपणा प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात.

Daylily

|

sakal 

ट्रू लिली (True Lily)

डेलिलीपेक्षा ही फुले वेगळी असतात. एकाच सरळ दांडीवर सुवासिक फुले आणि बाजूने गोलाकार पानांची रचना, हे याचे वैशिष्ट्य!

True Lily

|

sakal 

कार्डिनल फ्लॉवर (Cardinal Flower)

गर्द लाल (Scarlet) रंगाची ही फुले नदी, तलाव किंवा दमट जागी आढळतात. यांचा आकार हमिंगबर्ड्सना (Hummingbirds) खूप आकर्षित करतो.

Cardinal Flower

|

sakal 

कोनफ्लॉवर (Coneflower)

मधमाश्यांचा जिवलग मित्र म्हणजे कोनफ्लॉवर. जुलैच्या उन्हात ही फुले बागेला रंगीबेरंगी बनवतात. या फुलांच्या बिया पुढे जाऊन पक्षांसाठी उत्तम खाद्य ठरतात.

Coneflower

|

sakal 

जायंट हायसोप (Giant Hyssop)

या फुलांच्या जांभळ्या रंगाच्या लांब तुऱ्यांमधून एका खास मसाल्यासारखा (Liquorice) सुवास येतो. यामुळे फुलपाखरे आणि मधमाश्या इथे गर्दी करतात.

Giant Hyssop

|

sakal 

ब्लेझिंग स्टार (Blazing Star)

वरून खाली बहरणारे फूल! हे जांभळे नाजूक फूल वरून खालच्या दिशेने बहरत जाते. दिसायला अत्यंत आकर्षक असलेले हे फूल बागेचे सौंदर्य वाढवते.

Blazing Star

|

sakal 

स्वीट पेपरबुश (Sweet Pepperbush)

सुगंधाचा राजा! जुलैच्या उबदार हवेत या पांढऱ्या फुलांचा गोड आणि किंचित तिखट सुवास सगळीकडे पसरतो, जो मनाला ताजेतवाने करतो.

Sweet Pepperbush

|

sakal 

कल्टिव्हेटेड रोझ (Cultivated Rose)

गुलाबाचा राजेशाही थाट- अनेक पाकळ्यांचे आणि सुवासिक असणारे हे गुलाब जुलै महिन्यातील सर्वात लोकप्रिय फूल आहे. हे बागेत एक रोमँटिक वातावरण तयार करते.

Cultivated Rose 

|

sakal 

Keep Camphor at Home This Monsoon!

|

sakal 

आणखी वाचा