जाणून घ्या पावसाळ्यात कापूर जवळ ठेवण्याचे फायदे...

सकाळ डिजिटल टीम

हवेचे शुद्धीकरण (Air Purification)

कापरामध्ये नैसर्गिक जंतुनाशक (Antimicrobial) गुणधर्म असतात. हवेत पसरणारे हानिकारक जिवाणू आणि विषाणू नष्ट करून घरातील हवा शुद्ध ठेवण्याचे काम कापूर करतो.

Keeps the Air Fresh

|

sakal 

कुबट आणि बुरशीच्या वासापासून सुटका

दमट वातावरणामुळे घरात किंवा कपाटात येणारी दुर्गंधी कापूर शोषून घेतो. बाजारात मिळणाऱ्या महागड्या,केमिकल फ्री रूम फ्रेशनरपेक्षा कापराचा सुगंध सुरक्षित, जास्त काळ टिकणारा असतो.

Helps Eliminate Musty Odours

|

sakal 

डास,कीटक पळवून लावण्यास मदत

पावसाळ्यात डेंग्यू-मलेरिया पसरवणाऱ्या डासांचे प्रमाण वाढते. कापराचा कडक,तीव्र वास डास, माश्या, मुंग्या आणि झुरळांना सहन होत नाही. त्यामुळे घरात कापूर ठेवल्याने हे कीटक कमी होतात.

May Help Repel Mosquitoes and Insects

|

sakal 

श्वसनाच्या त्रासावर गुणकारी

पावसाळी हवेमुळे सर्दी, खोकला,नाक बंद होण्याच्या समस्या येतात. कापराचा मंद सुवास श्वासोच्छ्वास सुरळीत करतो. म्हणूनच बाम आणि चेस्ट रबमध्ये कापूर वापरला जातो.

Provides a Refreshing Aroma

|

sakal

मानसिक शांतता व सकारात्मक ऊर्जा

अरोमाथेरपीनुसार (Aromatherapy), कापरामध्ये मन शांत करण्याचे आणि तणाव कमी करण्याचे गुणधर्म असतात. ढगाळ वातावरणात येणारा सुस्तपणा दूर करून घरात प्रसन्नता निर्माण करण्यासाठी कापूर उपयोगी ठरतो.

Creates a Calm and Pleasant Atmosphere

|

sakal 

कपाटात ठेवा वड्या

कपड्यांना कुबट वास येऊ नये किंवा कपाटातील कीटक दूर राहावेत, यासाठी कपाटाच्या कोपऱ्यात कापराच्या वड्या ठेवाव्यात.

Place It Inside Your Wardrobe

|

sakal 

नॅचरल रूम फ्रेशनर

लिव्हिंग रूम किंवा बेडरूममध्ये इलेक्ट्रिक / टी-लाईट डिफ्यूझरचा वापर करून कापूर हलका गरम करावा. यामुळे घरभर सुवास पसरतो आणि डासांचा त्रास कमी होतो.

Use It as a Natural Room Freshener

|

sakal 

कापूर हा फक्त बाह्य वापरासाठी (For external use)

कापराचा वापर अंतर्गत बाबींसाठी (खाण्यासाठी) करू नये. घरात लहान मुले किंवा पाळीव प्राणी असल्यास कापूर त्यांच्या हाताला लागणार नाही अशा सुरक्षित जागी आणि उंचावर ठेवावा.

Important Safety Tips

|

sakal 

dizziness

|

sakal 

आणखी वाचा