भूक लागली म्हणून चिफ्स खाताय? आताच थांबा! आधी हे वाचा

Monika Shinde

भूक लागली म्हणून चिप्स खाताय?

दुपारच्या वेळी थोडी भूक लागली की आपण पटकन चिप्स खातो. पण हे खरंच चांगलं आहे का? थांबा... आधी हे जाणून घ्या!

प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे काय?

चिप्स, वेफर्स, बिस्किटं हे सगळे प्रक्रिया केलेले (processed) पदार्थ असतात. यात नैसर्गिक पोषण घटक कमी आणि साखर, मीठ, चरबी अधिक असते.

आरोग्यावर काय परिणाम होतो?

अशा खाण्याने तुमच्या शरीरात कॅलरीज वाढतात, पण पोषण मिळत नाही. लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.

भूक

भूक लागली की पटकन जे मिळेल ते खाण्याची सवय होते. पण ही भूक काही वेळच टिकते योग्य पर्याय निवडला, की ती सहज कमी होते.

पर्याय काय आहेत?

फळं, सुकामेवा, भरड धान्याचे खाऊ, दही किंवा मूठभर बदाम हे चांगले पर्याय आहेत. हे पटकन मिळतात आणि आरोग्यदायीही आहेत.

पौष्टिकता का महत्त्वाची?

जेवणातून फक्त पोट भरू नये, तर शरीराला आवश्यक पोषकतत्त्वं मिळाली पाहिजेत. तंतुमय, प्रथिनेयुक्त आणि नैसर्गिक अन्न तुम्हाला तंदुरुस्त ठेवतो.

सवयी बदला, आरोग्य बदलेल

सतत चिप्स, फास्टफूड खाण्याऐवजी आरोग्यदायी पर्याय निवडा. सुरुवातीला जड जाईल, पण लवकरच शरीर आणि मन याचा सकारात्मक अनुभव देतील.

कोण आहेत जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान? काय आहे त्यांचे शिक्षण?

येथे क्लिक करा