Monika Shinde
जपानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला पंतप्रधान झाल्या आहेत. साने ताकाइची हे नाव सध्या चर्चेत आहे. जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास आणि यशोगाथा.
साने ताकाइची यांचा जन्म ३ मार्च १९६१ रोजी नारा शहरात झाला. त्यांचे वडील विक्रेते होते आणि आई पोलीस खात्यात काम करत होत्या.
त्यांनी शिक्षणाची सुरुवात उनेबी हाय स्कूलमधून केली. लहानपणापासूनच त्या अभ्यासात हुशार व नेतृत्वगुण असलेल्या विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात.
हायस्कूलनंतर त्यांनी कोबे युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी मिळवली. ही संस्था जपानमधील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे.
पदवी शिक्षणानंतर त्यांनी मात्सुशिता इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नमेंट अँड मॅनेजमेंट येथून मास्टर्स पूर्ण केलं. इथे त्यांना नेतृत्व आणि धोरणात्मक प्रशिक्षण मिळालं.
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी टीव्ही अँकर आणि लेखिका म्हणून काम केलं. यामुळे संवादकौशल्य आणि जनतेशी जोडण्याची कला त्यांच्यात विकसित झाली.
त्यांच्या स्पष्ट धोरणात्मक भूमिका, निर्णयक्षम नेतृत्व आणि शिक्षणाच्या जोरावर त्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. २३७ मतांनी त्यांचा विजय निश्चित झाला.