जगातील असं सर्वात छोटं बेट, जिथे फक्त एकच घर आणि एकच झाड आहे

Varsha Balhe

अनोखं बेट

जगात एक असं बेट आहे, जिथे फक्त एक घर आणि एक झाड आहे. या बेटाच्या चारही बाजूंनी पाणी आहे. त्यामुळे हे बेट पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं.

Just Room Enough Island

|

esakal

ठिकाण

हे बेट अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात अलेक्झांड्रिया बे जवळ आहे. सेंट लॉरेन्स नदीतील थाउजंड आयलंड्स या बेटांच्या समूहात हे बेट आहे.

Just Room Enough Island

|

esakal

नाव

या बेटाचं नाव 'जस्ट रूम इनफ आयलंड' असं आहे. नावाप्रमाणेच या बेटावर फक्त एक घर बांधण्याइतकीच जागा आहे.

Just Room Enough Island

|

esakal

क्षेत्रफळ

या बेटाचं क्षेत्रफळ सुमारे ३,३०० चौरस फूट आहे. म्हणजेच साधारण एका टेनिस कोर्टाएवढीच याची जागा आहे.

Just Room Enough Island

|

esakal

कुटुंबाने का विकत घेतलं?

१९५० च्या दशकात सायझलँड कुटुंबाने हे बेट विकत घेतलं. सुट्टीच्या दिवसांत शांतपणे वेळ घालवता यावा, यासाठी त्यांनी तिथे एक छोटं घर बांधलं आणि एक झाड लावलं.

Just Room Enough Island

|

esakal

जगातील सर्वात छोटं वस्तीचं बेट

१९८२ मध्ये ब्रिटनमधील बिशप रॉक दीपगृह स्वयंचलित झाल्यानंतर या बेटाला जगातील सर्वात छोटं वस्तीचं बेट म्हणून ओळख मिळाली.

Just Room Enough Island

|

esakal

पर्यटकांना जाता येतं का?

हे बेट खासगी मालकीचं आहे. त्यामुळे पर्यटकांना बेटावर उतरता येत नाही. मात्र, सेंट लॉरेन्स नदीतून बोटीने प्रवास करताना हे छोटंसं बेट जवळून पाहता येतं.

Just Room Enough Island

|

esakal

बिबट्या रात्रीच शिकार का करतो? अंधारात त्याला नेमकं काय दिसतं?

Why Do Leopards Hunt at Night?

|

esakal

येथे क्लिक करा