बिबट्या रात्रीच शिकार का करतो? अंधारात त्याला नेमकं काय दिसतं?

Varsha Balhe

बिबट्या

बिबट्या हा प्रामुख्याने निशाचर प्राणी आहे. पण तो दिवसाऐवजी रात्रीच शिकार का करतो? यामागे निसर्गाचे एक मोठे रहस्य दडले आहे.

Why Do Leopards Hunt at Night?

|

esakal

दबा

बिबट्या हा दबा धरून शिकार करणारा प्राणी आहे. रात्रीच्या अंधारात त्याला झुडपांमध्ये लपून भक्ष्याच्या अगदी जवळ जाणे सोपे जाते.

Why Do Leopards Hunt at Night?

|

esakal

चाहूल

रात्रीच्या वेळी हरीण, रानडुक्कर किंवा इतर भक्ष्य प्राण्यांना नीट दिसत नाही. त्यामुळे त्यांना बिबट्याची चाहूल उशिरा लागते.

Why Do Leopards Hunt at Night?

|

esakal

अंधारात

चला, आता पाहूया अंधारात बिबट्याला नेमकं काय आणि कसं दिसतं. त्याच्या डोळ्यांची रचना अशी आहे की, त्याला माणसांपेक्षा ६ ते ७ पट अधिक स्पष्ट दिसते.

Why Do Leopards Hunt at Night?

|

esakal

प्रकाश

त्याच्या डोळ्यांत पडद्यामागे एक चमकणारा थर असतो जो अंधारात दुप्पट प्रकाश मिळवून देतो. यामुळेच रात्री बिबट्याचे डोळे चमकताना दिसतात.

Why Do Leopards Hunt at Night?

|

esakal

आकार

अंधारात त्याला रंग दिसत नाहीत, पण राखाडी आणि निळसर-हिरव्या रंगाच्या छटांमध्ये त्याला वस्तूंचे आकार आणि बारीक हालचाल अगदी स्पष्ट ओळखता येते. म्हणूनच तो रात्रीचा राजा आहे.

Why Do Leopards Hunt at Night?

|

esakal

जगातील या देशात ट्रेन रुळांवर नाही, तर हवेत लटकून धावते

World's Unique Hanging Train

|

esakal

येथे क्लिक करा