ब्रेस्ट मिल्क कोण दान करू शकतं?

Shubham Banubakode

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा

भारताची प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर एका अनोख्या कारणासाठी चर्चेत आहे. तिने ब्रेस्ट मिल्क बँकेला सुमारे ३० लिटर दूध दान केले आहे.

Jwala Gutta Donates 30 Litres Breast Milk

|

esakal

सोशल मीडियावर माहिती

ज्वालाने सोशल मीडियावर पोस्ट करत ब्रेस्ट मिल्क डोनेशनबाबत माहिती दिली. यासोबतच तिने इतरांनीही दूध दान करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

Jwala Gutta Donates 30 Litres Breast Milk

|

esakal

कोण दान करू शकते ब्रेस्ट मिल्क?

डॉक्टरांच्या मते, फक्त त्या माताच ब्रेस्ट मिल्क दान करू शकतात, ज्या आपल्या बाळाच्या गरजा पूर्ण करून अतिरिक्त दूध तयार करतात.

Jwala Gutta Donates 30 Litres Breast Milk

|

esakal

वैद्यकीय तपासणी आवश्यक

ब्रेस्ट मिल्क डोनेशनपूर्वी डोनर महिलेची वैद्यकीय तपासणी केली जाते. यात हेपॅटायटिस बी, सी, एचआयव्ही, सिफिलिससारखी तपासणी होते. तंबाखू किंवा जास्त मद्यपान करणाऱ्या महिला दानासाठी पात्र ठरत नाहीत.

Jwala Gutta Donates 30 Litres Breast Milk

|

esakal

दूध दान करण्याची प्रक्रिया

फक्त पूर्णपणे निरोगी आणि कोणत्याही संसर्ग किंवा व्यसनापासून मुक्त असणाऱ्या महिला ब्रेस्ट मिल्क दान करू शकतात. दूध दान करण्याची प्रक्रिया विहित पद्धतीनेच पार पाडावी लागते.

Jwala Gutta Donates 30 Litres Breast Milk

|

esakal

मिल्क बँकेत दान

ब्रेस्ट मिल्क दान करण्याची इच्छा असणाऱ्या महिला मिल्क बँकेत जाऊन तपासणी करून दूध दान करू शकतात. यासाठी विशेष किट्स देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे प्रक्रिया सुलभ होते.

Jwala Gutta Donates 30 Litres Breast Milk

|

esakal

ज्वालाचे आवाहन

ज्वाला गुट्टाने आपल्या कृतीतून इतर मातांना ब्रेस्ट मिल्क डोनेशनसाठी प्रेरित केलं आहे तिची ही कृती समाजात सकारात्मक बदल घडवू शकते.

Jwala Gutta Donates 30 Litres Breast Milk

|

esakal

या पाच कारणांमुळे कमी होतो 'सेक्स ड्राईव्ह'

 sex drive

|

esakal

हेही वाचा -