पृथ्वीचा श्वास की विनाशाचे तांडव? जाणून घ्या ज्वालामुखी का होतो

सकाळ डिजिटल टीम

मुख्य कारणं

ज्वालामुखी का होतो आणि तो कसा तयार होतो या मगची मुख्य कारणं काय आहेत जाणून घ्या सविस्तर माहिती.

Volcanic eruption

|

sakal 

पृथ्वीचे उष्ण अंतरंग

पृथ्वीच्या पोटातील थर (Mantle) अत्यंत उष्ण आहे. इतक्या प्रचंड उष्णतेमुळे तेथील खडक वितळतात आणि त्याचे मॅग्मा (Magma) नावाच्या जाड प्रवाही पदार्थात रूपांतर होते.

Volcanic eruption

|

sakal 

भूपट्टांची हालचाल

पृथ्वीचे वरचे कवच अनेक मोठ्या तुकड्यांमध्ये (Plates) विभागलेले आहे. जेव्हा हे भूपट्ट एकमेकांपासून दूर सरकतात किंवा एकमेकांवर आदळतात, तेव्हा जमिनीला भेगा पडतात आणि खालचा मॅग्मा वर येण्यास मार्ग मिळतो.

Volcanic eruption

|

sakal 

प्रचंड दाब

जमिनीच्या आत मॅग्मासोबत अनेक वायू आणि पाण्याची वाफ अडकलेली असते. जेव्हा या वायूंचा दाब सहनशक्तीच्या पलीकडे जातो, तेव्हा तो पृथ्वीचे कवच फोडून बाहेर येतो.

Volcanic eruption

|

sakal

उद्रेकाचे स्वरूप

ज्वालामुखीचा उद्रेक दोन प्रकारचा असतो - केंद्रीय (Central) ज्यामध्ये एका नळीसारख्या भागातून लाव्हा बाहेर येतो आणि भेगीय (Fissure) ज्यामध्ये जमिनीला पडलेल्या लांब भेगांतून लाव्हा संथपणे वाहतो.

Volcanic eruption

|

sakal 

लावा आणि मॅग्मा मधील फरक

जोपर्यंत वितळलेला खडक जमिनीच्या आत असतो, त्याला 'मॅग्मा' म्हणतात. परंतु, एकदा का तो जमिनीवर आला की त्याला 'लाव्हारस' (Lava) म्हटले जाते.

Volcanic eruption

|

sakal 

नव्या जमिनीची निर्मिती

ज्वालामुखी हे केवळ विनाशाचे प्रतीक नाहीत. लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात. भारताचे 'दख्खनचे पठार' हे अशाच प्राचीन ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झाले आहे.

Volcanic eruption

|

sakal 

सुपीक मृदा

ज्वालामुखीची राख आणि त्यापासून बनलेले खडक हे खनिजांनी समृद्ध असतात. त्यामुळे ज्वालामुखीच्या परिसरातील जमीन शेतीसाठी अत्यंत सुपीक असते.

Volcanic eruption

|

sakal 

पर्यावरणावर परिणाम

मोठ्या ज्वालामुखी उद्रेकामुळे वातावरणात राखेचे प्रचंड थर साचतात. यामुळे सूर्यप्रकाश अडवला जाऊन तात्पुरत्या स्वरूपात पृथ्वीचे तापमान कमी होऊ शकते, ज्याला 'ज्वालामुखीय हिवाळा' म्हणतात.

Volcanic eruption

|

sakal 

भारतात नाण्यांचे चलन सर्वप्रथम कोणी सुरू केले? वाचा यामागचं कारण अन् इतिहास...

India Coin Currency History

|

ESakal

येथे क्लिक करा