Sandip Kapde
यूट्यूबर ज्योति मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हिसार पोलिसांनी अटक केली आहे.
तिने तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली असून देशाच्या गुप्त माहितीची देवाण-घेवाण केली होती, अशी माहिती आहे.
शाही जीवनशैलीची प्रचंड इच्छा ज्योतीला देशविरोधी कृत्यात ढकलून गेली.
ज्योतीने १४ वर्षांपूर्वी रिसेप्शनिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली होती.
तिने खासगी शाळेत शिक्षिकेचे काम देखील काही काळ केले होते.
कोविड काळात गुरुग्राममधील नोकरी सोडून ती हिसारमध्ये परत आली आणि सोशल मीडियावर सक्रिय झाली.
यूट्यूब आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगमधून पैसे मिळू लागल्यानंतर तिने त्याच क्षेत्रात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
मोठ्या गाड्या, सेलिब्रिटीसारखा जीवनशैली आणि बँक खात्यात भरलेली रक्कम हिच्या प्राथमिक गरजा होत्या.
‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाने तिने यूट्यूब चॅनेल सुरू केला ज्याला सध्या 3.77 लाख फॉलोअर्स आहेत.
तिच्या इन्स्टाग्रामवरही 1.31 लाख फॉलोअर्स आहेत आणि ती विविध देशांतील प्रवासाचे अनुभव शेअर करते
तिच्या काही व्हिडिओंमध्ये पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवण्यात आली होती.
क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान भारत-पाकिस्तान सामन्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया दाखवणारे व्हिडिओ तिने पोस्ट केले होते
ज्योती आणि इतर पाच जण अशा सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे
पाकिस्तान उच्चायोगातील एका कर्मचाऱ्यासोबत तिचा संपर्क आला आणि तेथून तिची गुप्तहेरगिरी सुरू झाली