कोण आहे ज्योती मल्होत्रा? हेरगिरीच्या आरोपाखाली झाली आहे अटक

Shubham Banubakode

ज्योती मल्होत्रा कोण?

ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील एक प्रसिद्ध युट्यूबर आणि ट्रॅव्हल व्ह्लॉगर आहे. ती ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाने युट्यूब चॅनेल चालवते.

Jyoti Malhotra Arrested for Spying for Pakistan | esakal

पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप

ज्योतीवर पाकिस्तानसाठी हेरगिरी करून भारताची संवेदनशील माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप आहे. हिसार पोलिसांनी तिला अटक केली आहे.

Jyoti Malhotra Arrested for Spying for Pakistan | esakal

पाकिस्तान दौऱ्याचा संबंध

२०२३ मध्ये ज्योतीने पाकिस्तान उच्चायुक्तालयामार्फत व्हिसा घेऊन पाकिस्तानचा दौरा केला होता. यावेळी ती पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सच्या संपर्कात आली.

Jyoti Malhotra Arrested for Spying for Pakistan | esakal

दानिशशी जवळीक

ज्योतीची पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी दानिशशी जवळीक होती. त्याने तिची आयएसआय एजंट्सशी ओळख करून दिली. भारताने दानिशला १३ मे २०२५ रोजी ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित करून देश सोडण्याचे आदेश दिले.

Jyoti Malhotra Arrested for Spying for Pakistan | esakal

सोशल मीडियावर प्रचार

ज्योतीने इंस्टाग्रामवर पाकिस्तानशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि रील्स शेअर केले, ज्यात तिने पाकिस्तानबद्दल सकारात्मक माहिती प्रसारित केली.

Jyoti Malhotra Arrested for Spying for Pakistan | esakal

पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी कनेक्शन?

ज्योतीने पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी जानेवारीत श्रीनगर आणि पहलगामची रेकी केली होती. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये ती पुन्हा पाकिस्तानला गेली, ज्यामुळे संशय वाढला.

Jyoti Malhotra Arrested for Spying for Pakistan | esakal

कायदेशीर कारवाई

ज्योतीवर भारतीय दंड संहिता (BNS) कलम १५२ आणि ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट १९२३ च्या कलम ३, ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तिला ५ दिवसांच्या पोलीस रिमांडवर पाठवण्यात आले.

Jyoti Malhotra Arrested for Spying for Pakistan | esakal

सहा जणांना अटक

या प्रकरणात ज्योतीसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणा आणि पंजाबमधून इतर संशयितांना ताब्यात घेण्यात आले, जे पाकिस्तानी हेरगिरी नेटवर्कशी जोडलेले होते.

Jyoti Malhotra Arrested for Spying for Pakistan | esakal

हनीट्रॅपचा संशय

गुप्तचर यंत्रणा ज्योतीच्या प्रकरणात हनीट्रॅप अँगलची चौकशी करत आहेत. दानिशसोबतच्या तिच्या जवळच्या संबंधांमुळे हा संशय बळावला आहे.

Jyoti Malhotra Arrested for Spying for Pakistan | esakal

पत्नीला चुकूनही सांगू नका 'या' सहा गोष्टी, चाणक्य म्हणतो,"आयुष्यभर होईल पश्चाताप"

Chanakya Neeti 7 Things a Husband Should Never Tell His Wife | esakal
हेही वाचा -