kimaya narayan
अभिनेत्री तेजश्री प्रधान आज मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. पण तेजश्रीच्या इतर अभिनेत्यांबरोरबरील जोड्याही गाजल्या आहेत. जाणून घेऊया याविषयी.
तेजश्रीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पहिल्यांदा ज्या कलाकारांबरोबर गाजली तो म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ आणि तेजश्रीने झेंडा या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केलं. त्यांची जोडी अनेकांना आवडली.
त्यानंतर या दोघांनी पुन्हा एकदा 'लग्न पाहावे करून' या सिनेमात काम केलेलं. अनेकांना त्यांची जोडी पसंत पडली.
तेजश्री आणि वैभव ही जोडी एकत्र दिसली प्रेम हे या एपिसोडिक मालिकेत. या मालिकेत त्यांनी रुपेरी वाळूत नावाच्या एपिसोडमध्ये एकत्र काम केलं होतं. अनेकांना त्यांचं या एपिसोडमधील काम आणि ही जोडी आवडली.
आतापर्यंतची सगळ्यात जास्त गाजलेली आणि चर्चेत राहिली ती तेजश्रीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री शशांक केतकरबरोबर. होणार सून मी या घरची या मालिकेत त्यांनी काम केलं. त्यांची श्री-जान्हवीची जोडी अनेकांना आवडली.
अग्गबाई सासूबाई मालिकेच्या निमित्ताने तेजश्री आणि आशुतोषने पहिल्यांदा काम केलं. त्यांची केमिस्ट्री अनेकांना आवडली. खऱ्या आयुष्यातही ते चांगले मित्र आहेत.
तेजश्री आणि उमेशने असेही एकदा व्हावे या सिनेमात ऑनस्क्रीन जोडी म्हणून एकत्र काम केलं. अनेकांना त्यांची जोडी खूप आवडली. या जोडीने पुन्हा एकदा काम करावं अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली.
प्रेमाची गोष्ट मालिकेतील तेजश्री आणि राज हंचनाळेची जोडी अनेकांना आवडली. अनेकजण या जोडीला मिस करत आहेत.