दाट जंगलात लपलेली रहस्यमय गुहा; महाराष्ट्राच्या 'या' ठिकाणाबद्दल माहिती आहे का?

Shubham Banubakode

विदर्भातील रहस्यमय गुहा

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात दाट जंगल आणि डोंगररांगांमध्ये कचारगड गुहा आहे.

Kachargad Cave Gondia

|

esakal

नैसर्गिक गुहांपैकी एक

समुद्रसपाटीपासून तब्बल ५१८ मीटर उंचीवर असलेली ही गुहा सुमारे ९४ मीटर लांब आहे. तर प्रवेशद्वार तब्बल २५ मीटर रुंद आहे.

Kachargad Cave Gondia

|

esakal

अद्भुत ठिकाण

महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरील अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागात ही गुहा आहे. त्यामुळे या ठिकाणाबद्दल अनेकांना माहितीच नाही.

Kachargad Cave Gondia

|

esakal

‘कणकली’ देवीचे मंदिर

कचारगड गुहेमध्ये गोंड समाजाच्या श्रद्धेचे केंद्र असलेले कणकली देवीचे मंदिर आहे. दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

Kachargad Cave Gondia

|

esakal

महत्त्वाचे तीर्थक्षेत्र

१९८६ नंतर गोंड समाजात सांस्कृतिक जागृती वाढली आणि त्यानंतर कचारगड गुहेला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला.

Kachargad Cave Gondia

|

esakal

दरवर्षी भव्य यात्रा

माघ पौर्णिमेच्या काळात येथे चार दिवसांची मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातून हजारो भाविक येथे येतात.

Kachargad Cave Gondia

|

esakal

निसर्ग, अध्यात्म अन् इतिहासाचा

दाट जंगल, शांत वातावरण आणि श्रद्धा यामुळे कचारगड गुहा ही केवळ पर्यटनस्थळ नाही, तर अध्यात्मिक अनुभव देणारी जागा मानली जाते.

Kachargad Cave Gondia

|

esakal

विदर्भातील ‘हिडेन प्लेस’

अजूनही फारशा लोकांना माहिती नसलेली कचारगड गुहा विदर्भातील खऱ्या अर्थाने हिडन प्लेस आहे.

Kachargad Cave Gondia

|

esakal

शेवटच्या घटका मोजत असलेला शिवकालीन किल्ला, उरलाय फक्त एक बुरूज

fort

|

esakal

हेही वाचा -