शेवटच्या घटका मोजत असलेला शिवकालीन किल्ला, उरलाय फक्त एक बुरूज

Shubham Banubakode

दुर्लक्षित किल्ला

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लासुरा खुर्द गावात उभा असलेला लासुरा हा शिवकालीन किल्ला शेवटच्या घटका मोजत आहे.

Lasura Khurd Shivkalin Fort

|

esakal 

संरक्षण

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या किल्ल्याला एकेकाळी चार मजबूत बुरुज होते. संरक्षणाच्या दृष्टीने ही बुरुजं बांधण्यात आली होती.

Lasura Khurd Shivkalin Fort

|

esakal 

आज फक्त एकच बुरुज

काळाच्या ओघात आणि दुर्लक्षामुळे किल्ल्याचे बहुतांश अवशेष नष्ट झाले आहेत. आता फक्त एकच बुरुज उभा आहे,

Lasura Khurd Shivkalin Fort

|

esakal 

जिवंत इतिहास

लासुरा खुर्दमधील वृद्ध मंडळी आजही या किल्ल्याच्या वैभवाच्या कथा सांगतात. त्यांच्या आठवणींमध्ये हा किल्ला आजही जिवंत आहे.

Lasura Khurd Shivkalin Fort

|

esakal 

प्रशासनाचं दुर्लक्ष

पुरातत्व विभागाचे किंवा प्रशासनाचे लक्ष नसल्याने किल्ला हळूहळू ढासळत चालला आहे.

Lasura Khurd Shivkalin Fort

|

esakal 

खामगावपासून 7 किलोमीटरवर

खामगावपासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला सहज पोहोचण्याजोगा आहे, तरीही तो पर्यटकांच्या नजरेपासून दूर राहिला आहे.

Lasura Khurd Shivkalin Fort

|

esakal 

पर्यटनाची प्रचंड शक्यता

इतिहासप्रेमी आणि स्थानिक प्रशासनाने लक्ष दिल्यास हा किल्ला पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकतो. मात्र सध्या तो दुर्लक्षितच आहे.

Lasura Khurd Shivkalin Fort

|

esakal 

ऐतिहासिक ठेवा

हा किल्ला फक्त दगड-चुन्याची रचना नाही, तर शिवकालीन इतिहासाची जिवंत साक्ष आहे. त्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.

Lasura Khurd Shivkalin Fort

|

esakal 

गावातल्या विहिरी आटल्यात जमा; पण ७०० वर्ष जुन्या रहस्यमयी विहिरीला अजूनही पाणी

Ancient Barav of Yavatmal

|

esakal 

हेही वाचा -