Apurva Kulkarni
काजोल आणि अजय देवगन हे बॉलीवूडमधील फेमस कपल आहे. दोघांचंही एकमेकांवर अतुट प्रेम आहे.
अशातच काजोल आणि अजयचा एका जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काजलने हनिमूनचा किस्सा शेअर केला आहे.
काजोलने सांगितलं की, 'अजय देवगनने तिला लग्नानंतर 2 महिने हनीमूनला घेऊन जाण्याचं वचन दिलं होतं.'
दोघांनी लग्नानंतर वर्ल्ड टूर प्लान केली होती. परंतु हनिमूनच्या मधूनच अजय देवगन वापस घरी आला.
काजलने सांगितलं की, 'अजय खूप अशक्तपणा फिल करत होता. तो आजारी असल्याचं नाटक करत होता. ज्यामुळे त्याला हनिमून सोडून घरी यावं लागलं.'
काजल म्हणाली की, 'लग्नासाठी मी अजयला अट घातलेली की, लग्नानंतर तो दोन महिने मला वर्ल्ड टूरसाठी घेऊन जाईल. परंतु अर्ध्यातूनच तो वापस आला.'
'40 दिवसानंतर अजयला फिरणं बोर वाटू लागलं. त्यामुळे त्याने आजारी असल्याचं नाटक केलं आणि तो घरी आला.'