Payal Naik
सलमान खानचे कुटुंब मूळचे अफगाणिस्तानातील पश्तुन जमातीचे पठाण. त्याचे पणजोबा अन्वर खान ब्रिटिश रॉयल आर्मीमध्ये दाखल झाले आणि भारतात स्थायिक झाले.
अन्वर खान यांचे पुत्र अब्दुल रशीद खान यांनी आर्मीऐवजी पोलीस दलात प्रवेश केला. त्यांची इंदौरच्या होळकर संस्थानात थेट डीवायएसपी पदावर नियुक्ती झाली.
अब्दुल रशीद खान यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना डीआयजी पदावर बढती मिळाली. तो काळ भारतीयांसाठी उच्च पदे मिळवणे कठीण होता, पण त्यांच्या कामगिरीमुळे ते शक्य झाले.
त्यांचा इंदौरमध्ये जबरदस्त दरारा होता. ते कधीही रिव्हॉल्व्हर वापरत नसत, पण त्यांच्या हातातील दंडक्याने गुन्हेगारांची चड्डी ओली करायचे!
स्व. यशवंतराव होळकर यांनी अब्दुल रशीद खान यांच्या शौर्य व निष्ठेबद्दल खुश होऊन त्यांना ‘दिलेर जंग’ हा मानाचा किताब बहाल केला.
इंदौरच्या बडवाली चौकी भागात त्यांनी एक जुनं घर विकत घेतलं. ते पाडताना त्यांना होळकरांचा जुना खजिना सापडला.
रशीद खान यांनी हा खजिना सरकारला जमा केला. त्याबदल्यात त्यांना मोठं इनाम मिळालं, ज्यामुळे त्यांचे दिवस बदलले.
इनामातून त्यांनी मोठी हवेली विकत घेतली आणि त्यानंतर खान कुटुंबाची भरभराट सुरू झाली. त्यांच्या कुटुंबाचा इंदौरमध्ये मोठा दबदबा निर्माण झाला.
सलमान खानचा जन्म इंदौरमध्येच झाला. त्याचे आजोबा आणि काका आजही जुन्या हवेलीत राहतात. त्यांचे होळकर राजघराण्याशी चांगले संबंध आजही कायम आहेत.
आई हिंदू, वडील मुस्लिम, घरी कोणत्या धर्माचं पालन करतो सलमान खान? उत्तर देत म्हणाला...