Aarti Badade
विकेंडला काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा आहे? मग बनवा अस्सल चवीचा 'कोळंबी भात'. घरच्या घरी हॉटेलसारखा स्वाद मिळवण्यासाठी ही रेसिपी नक्की फॉलो करा.
Kolambi Bhat recipe
sakal
यासाठी १/४ किलो ताजी कोळंबी, २ वाट्या बासमती तांदूळ, आले-लसूण पेस्ट, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो आणि बटाट्याच्या फोडी तयार ठेवा.
Kolambi Bhat recipe
Sakal
कोळंबी भाताची चव वाढवण्यासाठी कोथिंबीर-पुदिना पेस्ट, गरम मसाला, बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि अख्ख्या खड्या मसाल्यांची (मिरी, लवंग, दालचिनी) पूड करून घ्या.
Kolambi Bhat recipe
Sakal
कोळंबीतील काळा धागा काढून ती स्वच्छ धुवून घ्या. तांदूळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा. यामुळे भात सुटसुटीत आणि लांबसडक होतो.
Kolambi Bhat recipe
Sakal
कुकरमध्ये तेल गरम करून तमालपत्र आणि कांदा परता. कांदा गुलाबी झाल्यावर टोमॅटो, आले-लसूण पेस्ट आणि पुदिना-कोथिंबीर पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता.
Kolambi Bhat recipe
sakal
मसाल्यात कोळंबी व बटाटे घालून परता. आता तांदूळ, बिर्याणी मसाला आणि लिंबाचा रस घाला. तांदळाच्या दुप्पट गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालून कुकरचे झाकण लावा.
Kolambi Bhat recipe
sakal
मध्यम आचेवर कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ द्या. वाफाळलेला सुगंधी कोळंबी भात तयार! ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा कोशिंबिरीसोबत याचा आस्वाद घ्या.
Kolambi Bhat recipe
Sakal
Konkan Special Sukat recipe
Sakal