कल्पना चावलाचा मृत्यू कसा झाला? लँडिंगच्या १६ मिनिटं आधी दुर्घटना

सकाळ डिजिटल टीम

सुनिता विल्यम्स ९ महिन्यांनी परतणार

अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे तब्बल ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांच्या परतण्याची प्रतिक्षा जगभरात केली जात आहे.

Sunita Williams | Esakal

भारतीयांचं लक्ष

भारतीय वंशाची असलेल्या सुनीता विल्यम्सच्या परतण्याकडे भारतीयांचंही लक्ष लागलं आहे.

Sunita Williams | Esakal

कल्पना चावलानेही कमावलं नाव

सुनिता विल्यम्सप्रमाणे आणखी एका भारतीय महिलेनं अंतराळ विश्वात नाव कमावलं. कल्पना चावलाने अंतराळ विश्वात देशाची मान उंचावली.

Kalpana Chawala | Esakal

हरियाणात जन्म

कल्पना चावलाचा जन्म हरियाणात झाला होता. अंतराळ मोहिमेवेळी तिचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

Kalpana Chawala | Esakal

दुसऱ्या अंतराळ मोहिमेत दुर्घटना

तिच्या दुसऱ्या अंतराळ मोहिमेला गेलेल्या कल्पना चावलाचा दुर्घटनेत मृत्यू झाला. कल्पना चावला पुन्हा परतणार की नाही हे कुणालाही खात्रीशीर माहिती नव्हतं.

Kalpana Chawala | Esakal

२२ वर्षांपूर्वीची घटना

१ फेब्रुवारी २००३ रोजी नासाचं अंतराळ यान ७ जणांसह पृथ्वीवर परत येत होतं.

Kalpana Chawala | Esakal

शटल झालं क्रॅश

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच यानाचं शटल क्रॅश झालं. या दुर्घटनेत सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला.

Kalpana Chawala | Esakal

कोलंबिया शटलचा स्फोट

यानाच्या विंगमध्ये झालेल्या छिद्राने बाहेरचा वायू अंतराळयानात वेगाने भरला. यामुळे सेन्सर खराब होऊन शेवटी कोलंबिया शटलचा स्फोट झाला.

Kalpana Chawala | Esakal

लँडिंगच्या १६ मिनिटं आधी दुर्घटना

नासाने दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या १६ मिनिटं आधी ही दुर्घटना घडली. पृथ्वीवर परतण्याच्या काही क्षण आधी स्पेस क्राफ्ट क्रॅश झालं.

Kalpana Chawala | Esakal

सुनिता विल्यम्सच्या कुटुंबात कोण कोण?

इथं क्लिक करा