महिला असल्याने संशोधनासाठी नकार; तरीही कमला सोहोनी यांनी विज्ञान क्षेत्रात रचला इतिहास!

Anushka Tapshalkar

ऐतिहासिक कामगिरी!

कमला सोहोनी या अग्रगण्य भारतीय महिला शास्त्रज्ञ होत्या. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

KAMALA SOHONIE: THE INDIAN WOMAN SCIENTIST

|

sakal

इंदोरमध्ये झाला जन्म

कमला सोहोनी यांचा जन्म १८ जून १९११ रोजी इंदोर येथे झाला. वडील आणि काका रसायनशास्त्राचे अभ्यासक असल्याने त्यांना लहानपणापासूनच विज्ञानाची आवड होती.

KAMALA SOHONIE: THE INDIAN WOMAN SCIENTIST

|

sakal

दुर्गा भागवत यांच्याशी खास नातं

प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत या कमला सोहोनी यांच्या बहीण होत्या. शिक्षण आणि ज्ञानाची आवड असलेल्या या दोन्ही भगिनींनी आपापल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

KAMALA SOHONIE: THE INDIAN WOMAN SCIENTIST

|

sakal

उच्च शिक्षणासाठी केला संघर्ष

कमला यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये महिला असल्यामुळे डॉ. सी. व्ही. रामन यांनी सुरुवातीला प्रवेश नाकारला; मात्र, संघर्षानंतर त्यांना अटींसह संशोधनाची संधी मिळाली.

KAMALA SOHONIE: THE INDIAN WOMAN SCIENTIST

|

sakal

परदेशातही संशोधनाची भरारी

कमला सोहोनी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनंतर केंब्रिज विद्यापीठात संशोधन केले. वनस्पती आणि अन्नपदार्थांतील प्रथिनांचा अभ्यास हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख क्षेत्र होते.

KAMALA SOHONIE: THE INDIAN WOMAN SCIENTIST

|

sakal

दूध, कडधान्ये, नीरावर संशोधन

कमला सोहोनी यांनी दूध, कडधान्ये आणि नीरा यांतील पोषक घटकांचा अभ्यास करून पोषणशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

KAMALA SOHONIE: THE INDIAN WOMAN SCIENTIST

|

sakal

संशोधनाचा गौरव

कमला सोहोनी यांना विज्ञानातील योगदानासाठी राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांनी अन्नभेसळीवर संशोधन केले. ‘आहारगाथा’ हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे.

KAMALA SOHONIE: THE INDIAN WOMAN SCIENTIST

|

sakal

आजच्या डायपरमागे आहे या महिलेची कल्पना! जाणून घ्या मॅरियन डोनोव्हन यांची कहाणी

Marion Donovan — waterproof baby diaper

|

sakal

आणखी वाचा