आजच्या डायपरमागे आहे या महिलेची कल्पना! जाणून घ्या मॅरियन डोनोव्हन यांची कहाणी

Anushka Tapshalkar

मॅरियन डोनोव्हन यांचा जन्म

मॅरियन ओ'ब्रायन डोनोव्हन यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९१७ रोजी अमेरिकेतील इंडियाना राज्यातील साउथ बेंड येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना नवनवीन गोष्टी बनवण्याची आवड होती.

Marion Donovan — waterproof baby diaper

|

sakal

रोजच्या समस्येतून शोधाची कल्पना

मुलीचे कापडी डायपर वारंवार बदलावे लागणे, कपडे आणि बेडशीट ओले होणे यामुळे त्या त्रस्त होत्या. या समस्येवर सोपा आणि प्रभावी उपाय शोधण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

Marion Donovan — waterproof baby diaper

|

sakal

शॉवरच्या पडद्यापासून डायपर कव्हर

मॅरियन यांनी शॉवरच्या पडद्याचे कापड कापून आणि शिवून वॉटरप्रूफ डायपर कव्हर तयार केले. नंतर त्यांनी पॅराशूटच्या कापडाचा वापर करून त्यात आणखी सुधारणा केली.

Marion Donovan — waterproof baby diaper

|

sakal

डायपर कव्हरमध्ये काय होते खास?

त्या काळातील रबरच्या पँट्सपेक्षा मॅरियन यांचे डायपर कव्हर आरामदायी होते. त्यात स्नॅप बटणे आणि शोषक डायपरसाठी स्वतंत्र जागा होती, ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत होत होती.

Marion Donovan — waterproof baby diaper

|

sakal

'बोटर' नावाच्या उत्पादनाला यश

मोठ्या कंपन्यांनी कल्पना नाकारल्यानंतर मॅरियन यांनी स्वतः उत्पादननिर्मिती सुरू केली. १९४९ मध्ये सॅक्स फिफ्थ अव्हेन्यू येथे त्यांच्या ‘बोटर’ डायपर कव्हरची विक्री सुरू झाली आणि ते लोकप्रिय झाले.

Marion Donovan — waterproof baby diaper

|

sakal

डिस्पोजेबल डायपरचीही कल्पना

१९५१ मध्ये मॅरियन यांना डायपर कव्हरचे पेटंट मिळाले. पुढे त्यांनी शोषक कागदापासून डिस्पोजेबल डायपरची कल्पना मांडली, जी सुरुवातीला दुर्लक्षित झाली.

Marion Donovan — waterproof baby diaper

|

sakal

डायपरपुरता मर्यादित नव्हता आविष्कार

मॅरियन यांनी येल विद्यापीठातून वास्तुकलेचे शिक्षण घेतले. कॉम्पॅक्ट हँगर, साबणदाणी आणि डेंटालूपसारख्या उत्पादनांचे पेटंटही मिळवले. त्यांचे निधन ४ नोव्हेंबर १९९८ रोजी झाले.

Marion Donovan — waterproof baby diaper

|

sakal

पुरुषांआधी महिलेने लावला वायपरचा शोध! आज प्रत्येक कारमध्ये आहे तिचीच कल्पना

Bertha Benz The First Driver in the World

|

sakal

आणखी वाचा